Sunday, June 7, 2015

अफजलखानाचा पुतळा उभारायचा का ?

महाराष्ट्राच्या भूमीत आपले राजकीय जाळे पसरवण्यात बर्‍यापैकी यशस्वी झाल्याने एमआयएम पक्षाने आपली जात दाखवायला प्रारंभ केला आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतळे उभारण्यास एमआयएम पक्षाचे औरंगाबद येथील आ. इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. इथवरच एमआयएमचा हिरवा विचार थांबला नसून तमाम हिंदूंचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात होणारे स्मारक यालाही जलील यांनी विरोध दर्शवला असून यासाठी वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा दिलेला आहे. त्यामुळे शिवछत्रपींचा नको मग काय अफजलखानाचा पुतळा उभारायचा का? असा संतप्त सवाल महाराष्ट्रातील मराठी मनात खल करु लागला आहे. एमआयएमने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास विरोध करण्यासाठी आपली जिव्हा टाळूला लावावी तीही शिवराज्याभिषेकदिनी याला काय म्हणावे? किती यांचे लाड पुरवायचे. केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे की, एमआयएमचे हे आता सत्ताधार्‍यांनी स्पष्ट करायला हवे. अकबरुद्दीन व असदुद्दीन ओवेसी या द्वयींचा असलेला एमआयएम पक्ष संविधानाच्या विरोधी विचार सरणीचा आहे हे वेळोवेळी या दोघं बंधुंच्या विखारी बोलण्याने जगासमोर आलेलेच आहे. आ. प्रणिती शिंदे या एकट्या रणरागीणीने या पक्षावर ओवेसी बंधुंवर शरसंधान साधत हा पक्ष सिमी विचार सरणीचा असून त्याच्यावर बंदी आणा असा घणाघात कधीच केला आहे. हा आरोप जिव्हारी लागल्याने एमआयएमने त्यांना नोटीस देखील पाठवली होती. एमआयएम पक्षाने अल्पसंख्यांक व दलित व्होट बँक काबीज करुन महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश मिळविला आहे. एमआयएम पक्ष राज्यात वाढीस लागणे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी घातक असल्याचे सर्वच बोलत असतात. मग पक्षाला मिळालेला मतांचा आकडा आला कोठून? महाराष्ट्रातील मुस्लिम समाज त्यातल्या त्यात तरुण या पक्षाकडे आकर्षिला जात आहे. ग्रामीण भागापर्यंत ओवेसी बंधुंचे बॅनर, पोस्टर्स झळकू लागले आहेत. म्हणजेच याच मातीतून एमआयएमला खतपाणी मिळते आहे. एरवी अकबरुद्दीन ओवेसी हिंदूंवर आक्षेपार्ह दर्पोक्ती करायचा आज त्या पक्षाच्या आमदाराने स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल जाहीरपणे विरोध करणे म्हणजे आम्ही आमची जागा तपासून बघण्याची वेळ आली आहे असे समजावे. एकीकडे किल्ले रायगडावर राजेशाही थाटात महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा होतोय देशभरातून त्यांचे मावळे गडावर पोहोचलेत याच शिवछत्रपतींनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला. दुश्मनाचा खातमा झाला दुश्मनी संपली म्हणून मेलेल्या अफजलखानाचे मुस्लिम धर्माच्या रिवाजानुसार किल्ले रायगडावर थडगे बांधले. ज्या राजा विषयी बोलतांना औरंगजेब विचार करुन बोलतांना. महती सांगताना स्वतःला आवर घालू शकला नव्हता. ‘दोस्त हो शिवबा जैसा और दुश्मन भी हो तो शिवाजी जैसा’ असे म्हणत औरंगाजेबाने गौरोद्गार काढले होते. त्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक राजा विषयी मत मांडण्याची लायकी या इम्तियाज जलील याचीच काय पण एमआयएम पक्षाची नाही! राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसेंनी स्वतंत्र उर्दू शाळा असतांना मराठी शाळेत उर्दू घुसवायची. पंतप्रधानांनी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तैय्यार असल्याची ग्वाही द्यायची राममंदीर मुद्द्याला बगल द्यायची मग शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध होणारच आहे. आता यापुढे अफजलखानाचे, औरंगजेबांचे पुतळे उभारले गेले आश्‍चर्य वाटायला नको!

No comments:

Post a Comment