Friday, June 19, 2015

19 June 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख

जळगाव  नगरी महाराष्ट्रात सुवर्ण नगरी म्हणून सर्वदूर सुपरिचित आहे. जळगावला सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय वारसा असतांना शहराला वेळोवेळी लाभलेले पोलीस अधिकारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात यशस्वी ठरले आहेत. एव्हाणा काही अधिकार्‍यांनी कर्तव्य बजावतांना दाखवलेली दबंगगिरी आजही जिल्हा वासियांच्या स्मरणात आहे. पण जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकपदी डॉ.जालिंदर सुपेकर आले आणि पोलीसांच्या नावाला जणू ग्रहणचं लागले. यात कदाचित डॉ.सुपेकर यांचा साधेपणा नडत असावा. किंवा सुपेकर पोलीसांवर पोलीसींग करण्यात कमी पडत असावेत. पोलीस अधिक्षक कार्यरत असलेल्या जळगाव शहराची दशा अत्यंत बिकट झालेली आहे. महिलांचे सार्वजनिक ठिकाणी फिरणे असुरक्षित वाटू लागले आहे. सौभाग्याचे व मांगल्याचे प्रतिक म्हटलेले मगळसुत्र गळ्यातून काढून घरातील खुंटीवर टांगण्याची वेळ आली आहे. एवढ्या मंगळसुत्र चोरीच्या घटना दिवसाढवळ्या घडू लागल्या आहेत. शहरात बलात्कार, खून, दरोडे, तरूणींची छेडखानी हे अनुचित प्रकार सर्रास घडू लागले आहेत. काल दिवसा ढवळ्या रिंधुरवाडा या शनिपेठ पोलीस हद्दीत अज्ञात दरोडेखोरांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून 50 लाख रूपयांचे सोने लुटले. बंगाली कारागिरांना या अज्ञात चोरांनी ज्या पध्दतीने बांधून खोलीत कोंडून सोने घेवून पोबारा केला. हा तपासाचा भाग असला तरी जिल्ह्यातील पोलीसांचा धाक संपला असल्याचे प्रतिक आहे. आज पुन्हा जिल्ह्यातील चोपडा शहरात जे.डी.सी.सी. बँक शाखा चुंचाळेच्या व्यवस्थापकाकडून 10 लाख रूपये अज्ञात चोरट्यांनी पळविले. चोपड्यात ही तिसरी घटना असून आतापर्यंत 22.50 लाख रूपये याच पध्दतीने लांबविण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याला पोलीस अधिकार्‍यांची वेगळी अशी ओळख राहीलेली आहे. यात स्व.दिपक जोग त्यांच्यापासून वसंत कोरेगावकर, संतोषकुमार रस्तोगी प्रविण सांळुखे, धनंजय कुठकर्णी, एस.जयकुमार, इशु सिंधू, दिलीप सावंत आदींनी जिल्हा गाजवला आहे. काहीसे वादग्रस्त असले तरी डि.वाय.एस.पी.दिलीप शंकरवार, वाय.डी. पाटील, संजय पाटील आदींनीही गुन्हेगारांवर वचक ठेवला होता. आज जळगाव पोलीसांची खाकी बदनाम होवू पाहते आहे. जिल्हा पोलीस दलात नुकतेच मोठे फेरबदल (बदल्या) झाल्या. या बदल्या कागदावर शासकीय पातळीवर दाखविण्यात येत असल्या तरी बदल्यांमागे घडलेले राजकारण सर्वश्रृत आहे. आता सत्तेत असतांना आणि पूर्वी सत्तेत नसतांना जिल्ह्यात कोणता पोलीस अधिकारी कुठे जाईल हे कोणता नेता ठरवतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या राजकारणामुळे हाजी हाजी करणारे अधिकारी जिल्ह्याच्या माथी मारण्यात येत आहे. आजच्या तारखेला जळगाव जिल्ह्यात एकही डॅशिंग पोलीस अधिकारी कर्तव्यास हजर नाही. अनेकांनी जिल्ह्यात येण्याची इच्छा व्यक्त केली असतांना संबधित नेत्याच्या घरी खेटे घातले पण नाथ कुणालाच पावला नाही. जळगाव जिल्हा पोलीसात स्थानिक गुन्हे शाखा हे एकमेव डिपार्टमेंट तग धरून आहे. एलसीबीच्या ऑक्सिजनवर जिल्हा पोलीस किती दिवस जगणार आहे. एलसीबी सुध्दा काही प्रमाणात वादाच्या भोवर्‍यात सापडू लागली आहे. जिल्ह्यात कदाचित आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होवू शकतो. राज्याचे गृहखाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडेच राखून ठेवले आहे. मुख्यमंत्र्याच्या अधिपथ्याखाली असलेल्या गृहखात्याची अब्रू जळगाव जिल्ह्यात वेशीवर टांगली जात आहे. जिल्ह्यातले राजकारण त्यात जिल्हा पोलीसात आपसात सुरू असलेले राजकारण या दोन्हींचा फटका जिल्ह्यातील सामान्य जनतेला बसत असून सुपेकर साहेब हे काय चाललंय असा सवाल मुख्यमंत्री आज आल्यास त्यांनी विचारला पाहिजे.

No comments:

Post a Comment