15 June 2015 चा दैनिक जळगाव माझामधील अग्रलेख

उंदराला कापडाचा तुकडा सापडावा आणि उंदराने तो कापड घेवून घरभर फिरावे या कापडाला ‘गळ्यात ठेवू की नळ्यात ठेवू’ अशी अवस्था या उंदराची होत असते. शेवटी चिंधी चोरच तो. दिल्लीतील काँग्रेसची अवस्था देखील या उंदरापेक्षा वेगळी नाही. ‘सौ चूहे खा के बिल्ली हज को चली’ या उक्तीप्रमाणे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेल्या काँग्रेसने भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी करून स्वत:चे हसे करून घेतले आहे. वर्षभरापूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जवळ जवळ देशभरात सपाटून मार खाल्ला होता. यामागचे मुख्य कारण देशात बोकाळत चाललेला भ्रष्टाचार, बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था हेच होते. काँग्रेसने देश स्वातत्र्य झाल्यापासून देशावर सत्ता करत असतांना केलेले पातक काम काँग्रेस विसरू शकते. मात्र जनता अजून विसरलेली नाही. आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी असलेले व आयपीएलचे पहिले आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याचा खुलासा ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी दैनिकाने केल्यानंतर काँग्रेसने वाचाळवीर म्हणून पाळलेले दिग्वीजय सिंग यांनी या प्रकरणात नेहमी प्रमाणे नाक खूपसत सुषमा स्वराज यांनी राजीनामा दयावा असे ट्विट केले तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ललित मोदी हे आजही आयपीएल प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) यादीत वान्टेड म्हणून आहेत. अशा वान्टेड व्यक्तीला मदत केली असे भांडवल काँग्रेस करू पाहते आहे. ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पाहायचे वाकून’ राहूल गांधी अज्ञात वासातून आल्यापासून काँग्रेसचे असेच धोरण सुरू झाले आहे. सुषमा स्वराज यांचा राजीनामा मागणार्या दिग्गी राजांचे प्रताप सर्वश्रृत आहेत त्या विषयावर स्वतंत्र लिखाण होवू शकते. या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारून सुषमा स्वराज यांनी आपल्या परराष्ट्र मंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली यातच या प्रकरणाची हवा निघाली आहे. सुषमा स्वराज यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा असतांना लोकसभेत त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण विरोधी गट देखील बेंच वाजवून अंर्तमुख होवून ऐकतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुषमा स्वराज यांच्या पाठीशी असतील. सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना मदत केली हे मान्य करत असतांना केवळ मानवता धर्म निभवतांना ही मदत झाली. सन 2014 आपण परराष्ट्र मंत्री असतांना ललित मोदी यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली होती. 4 ऑगस्ट दरम्यान त्यांच्यावर पोतुगाल येथे शस्त्रक्रिया होणार होती. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये कन्सेट पेपरवर स्वाक्षरी करण्यासाठी ललित मोदींनी आपल्याला बोलावल्याचे स्वराज यांनी मान्य केले आहे. सुषमा स्वराज या भारतीय जनता पक्षात आक्रमक आणि अभ्यासपूर्ण अभिभाषणासाठी ओळखल्या जातात. 1996 पासून त्या लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण दूरसंचार, संसदीय कार्यमंत्री हे महत्वाचे खाते सांभाळले आहे. 1998 मध्ये अल्पकाळासाठी स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री देखील होत्या. देशात एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या त्यावेळी देशाचे पंतप्रधान कोण असेल यासाठी भारतीय जनता पक्षाची चाचपणी सुरू असतांना सुषमा स्वराज यांचे नाव आघाडीवर होते. शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांच्यात पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असल्याचे कधीच जाहीर करून टाकले होते. जेव्हा केव्हा त्यांना पंतप्रधान करण्याचा विषय पुढे येईल. तेव्हा आपला जाहीर पाठिंबा असेल असेही बाळासाहेबांनी त्याकाळी सांगितले होते. आज स्वत:चे अस्तित्व हरवलेली काँग्रेस कुठला तरी मुद्दा हाताशी घेवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे.
No comments:
Post a Comment